किनवट : येथील साहित्यिक कवी रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहास अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्यकेंद्र, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील "सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे मराठी साहित्य मंडळाच्या वतीने नुकत्याच आयोजित २० व्या राज्यस्तरीय कविसंमेलनात त्यांना कार्यक्रमाचे उद्घाटक तथा ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय केळकर यांचे हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक सिध्देश्वर कोळी (उस्मानाबाद) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे स्वागताध्यक्ष होते.नौपाडा विभागाच्या माजी नगरसेविका प्रतिभाताई राजेश मढवी ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. शाल, सन्मानचिन्ह व मानदपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या प्रसंगी झालेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक कवी यांनी हजेरी लावली होती. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या प्रेरणेतून, आयोजकठाणे जिल्हा उपाध्यक्षा प्रणिता देवरे आणि ठाणे जिल्हाउपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कवडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
कवी रामस्वरूप मडावी यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल किनवट येथील साहित्य क्षेत्रातील उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर, मुख्याध्यापक मोहन जाधव, रुपेश मुनेश्वर, सुर्यभान खंदारे, किशन धुर्वे, देविदास वंजारे, प्रदीप कुडमेथे, सुरेश पाटील, राजेश पाटील व मित्र परिवार यांनी त्यांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment