लोणी शाळेत पहिलीत प्रवेशीत विद्यार्थ्यांची बाईक रॅली काढून फुगे, चॉकलेट देऊन जल्लोषात स्वागत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 16, 2024

लोणी शाळेत पहिलीत प्रवेशीत विद्यार्थ्यांची बाईक रॅली काढून फुगे, चॉकलेट देऊन जल्लोषात स्वागत

 


किनवट  : कमठाला केंद्रांतर्गत लोणी शाळेत पहिल्याच दिवशी  इयत्ता पहिली प्रवेशित मुलांचे बाईक रॅली काढून फुगे, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार आणि पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.      

            शाळा प्रवेश उत्सव झाला पाहिजे या उद्देशाने शासनाने शाळा प्रवेश पंधरवडा आणि पहिल्या दिवशी विविध उपक्रमाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे धोरण अवलंबले. त्या अनुषंगाने किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे पहिलीत प्रवेशीत मुलांचे बाईक वरून गावातील प्रमुख मार्गाने ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. शिक्षकांच्या मोटारसायकल वर बसल्याने विद्यार्थीही आनंदीन दिसत होते. त्यानंतर शाळेत पुष्पगुच्छ चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. पाठ्यपुस्तकाचे वितरण पहिल्या दिवशी करून शालेय पोषण आहार अंतर्गत खिचडी देण्यात आली. 



            यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर, मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर, अंकुश राऊत, विद्या श्रीमेवार, राहुल तांमगाडगे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील गजानन लोंढे, मारोती बादड, हनमंत गुंजकर, निळकंठ गुंजकर, महेंद्र गुंजकर, कैलास सोळके, परमेश्वर गुंजकर, पांडूरंग गुंजकर, सुषमा सोळंके, सपना काळे आदी माता पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News