विधानसभा निवडणुकीत धडपडणारा आंबेडकरवादी एकवटणार -श्याम निलंगेकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 17, 2024

विधानसभा निवडणुकीत धडपडणारा आंबेडकरवादी एकवटणार -श्याम निलंगेकर

 




छ.संभाजीनगर (औरंगाबाद ): आगामी विधानसभा निवडणुकीत धडपडणारा आंबेडकरवादी एकवटणार असल्याचे प्रतिपादन भीमयोद्धा श्याम निलंगेकर यांनी केले.


     संभाजीनगर,औरंगाबाद येथील नागसेनवन परिसरातील डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या  सभागृहात आयोजित मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या चिंतन बैठकीचा अध्यक्षीय समारोप करतांना भीमयोद्धा  श्याम निलंगेकर बोलत होते. यावेळी  इंजि.भीमसेन कांबळे, प्रा.व्यंकटराव कसबे, के.ई.हरिदास यांची उपस्थिती होती.


     मागील लोकसभेच्या निवडणुकीत आंबेडकर अनुयायांचं स्थान व आगामी विधानसभा निवडणुकीत काय स्थान असेल? यावर संजय वाघमारे, किशोर मस्के, प्रा.अजय काकडे, अनंत खोब्रागडे, मारुती साळवे, अमित उमरजकर यांनी विचार मंथन केले.


     मंथन बैठकीत विनोद वाघमारे, विलास कठारे, संजय सुगंधे, विजय भालेराव, शुद्धोधन वाठोरे, विलास पगारे, आदी बनसोडे, अनंत भवरे, चंद्रमुणी गाडेकर आदींनी सहभाग घेतला.


     चिंतन बैठकीस मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विलास कटारे यांनी केले होते. इंजि.भारतकुमार कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व  आभार मानले.


*धडपडणाऱ्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची सोमवार,२४ जून रोजी ठाण्यात चिंतन बैठक*

संभाजीनगर,औरंगाबाद नागसेन परिसरातील डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आंबेडकरी मतदारांचे लोकसभेच्या निवडणुकीत मतदान एकवटले नाही, याची खंत व्यक्त करून महाराष्ट्रतील सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या बैठका घ्याव्यात असा विचार पुढे आला. महाराष्ट्रातील विभागवार बैठका घेऊन धडपडणाऱ्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला.

    सोमवार,२४ जून २०२४ रोजी दुपारी १२.०० ते  सायं ४.०० वाजेपर्यंत *ऍड.गोपाळ भगत,यांचा बंगला, गंधकुटीनगर, सुब्रह्मण्यम स्वामीटेम्पल, डिफेन्स कॉलनी, अंबरनाथ जि.ठाणे* येथे चिंतन बैठक  घेण्यात येणार आहे. बैठकीस  येणारांनी (७७९८५५९५७७) या मोबाईल/व्हाट्सअपवर कळवावे,म्हणजे आपली व संयोजकाची गैरसोय होणार नाही. असे समन्वय *इंजि.भरतकुमार कानींदे* व *श्याम निलंगेकर* यांनी कळविले आहे.


     

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News