*किनवट येथे आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 21, 2024

*किनवट येथे आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा*



किनवट : योग दिनाच्या निमीत्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे, ही आपल्या देशासाठी अभीमानाची बाब आहे. कारण, योगा हा आपल्या भारताच्या सांस्कृतीक वारसाचा अविभाज्य भाग आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.  दि. 21 जून, 2024 हा दिवस 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आयोजित करण्याच्या केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार येथील तालुका क्रीडा संकुलात तालुका प्रशासनाच्या वतीने " आंतरराष्ट्रीय योग दिन " साजरा करण्यात आला.

     याप्रसंगी किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार मुगाजी काकडे,केंद्र प्रमुख रमेश राठोड, मुख्याध्यापक ना.ना. पांचाळ,क्रीडा प्रशिक्षक संदीप यशीमोड, डॉ. अशोक चिन्नावार, बाळकृष्ण कदम, अजय कदम, राजेश पाटील, संजय धोबे, रामराव राठोड, राजु मेलडे, अतिष तामगाडगे, रोमा गादेकर, संपर्का कानिंदे, बेबीराणी श्रीनिवास माहूरकर आदिं प्रमुखांसह शासकीय व्यायाम शाळेतील युवक तथा कराटे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक भदाने यांनी योगासनांची प्रात्यक्षिके  घेतली. उत्तम कानिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले.

       दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व अतुलनीय आहे. कारण  दिनचर्येसोबत मानव शारीरीक श्रमापासून दूर होत चालला आहे. त्यामुळे विविध आजारांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यापासून वाचण्यासाठी मानवाला नित्य योगा व व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीर सृदृढ व निरोगी होईल या उद्देशानेच शुक्रवारी (दि.21) आंतरराष्ट्रीय योग दिना साजरा करण्यात आला.


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News