किनवट : भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेच्या वतीने येथील एन. के.गार्डनमध्ये मंगळवारी (ता.25जून) सायंकाळी 07.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक घटना व प्रसंग अभिनयातून उलगडून दाखवणारे " संघम् शरणंम् गच्छामि " ह्या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. तेव्हा हा नाट्यप्रयोग सर्वांनी सपरिवार येऊन पहावा असे अवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी केले आहे.
अभ्युदया आर्ट अकादमी हैद्राबाद या नाट्य संस्थेच्या वतीने आजपर्यंत तेलंगाणासह विविध ठिकाणी पाचशेहून अधिक प्रयोग सादर केले आहेत. कलावंतानी केलेलं सादरीकरण अप्रतिम असल्याने याचा लाभ आपल्या परिसरातील सर्वांना व्हावा या उद्देशाने नाट्यरसिक तथा भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हे नाटक येथे निःशुल्क आयोजित केले आहे. तेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे सर्व तालुका शाखा पदाधिकारी, वार्ड शाखा पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते , बौद्ध उपासक- उपासिका व आंबेडकर प्रेमी रसिकांनी आपल्या परिवारासह या नाटकाचा आश्वावाद घ्यावा, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.






No comments:
Post a Comment