विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाची जय्यत पूर्वतयारी; योग्य खबरदारी घेण्याच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 24, 2024

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाची जय्यत पूर्वतयारी; योग्य खबरदारी घेण्याच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

 


मुंबई  (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून पासून सुरू होत असून सर्व संबंधित विभागांनी उत्तमप्रकारे पूर्वतयारी करावी. अतिवृष्टीसंदर्भातील इशारा तातडीने सन्माननीय सदस्य आणि पत्रकार यांना उपलब्ध व्हावा त्याचप्रमाणे साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी, कर्मचाऱ्यांना रेनकोट बरोबरच पावसाळी बूट देखील उपलबध करुन देण्यात यावेत अशा सूचना विधानपरिषद उपसभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.  आज विधानभवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशन संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.  या बैठकीस पोलीस, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, हवामान विभाग, एमटीएनएल, मध्य आणि कोकण रेल्वे, मेट्रो प्रकल्प अशा सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  


या बैठकीत प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिवेशनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  विद्यमान १४व्या विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे.  त्याचप्रमाणे दिनांक १२ जुलै, २०२४ रोजी विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित ११ विधानपरिषद सदस्यांची निवड प्रस्तावित आहे.  त्यादृष्टीने विधानमंडळात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आणि सुरक्षा विभागाने सुयोग्य नियोजन करावे.  शनिवार, दिनांक २९ जून, २०२४ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज होणार असल्याने सन्माननीय सदस्यांचे जाण्याचे आणि सोमवारी येण्याचे रेल्वे आरक्षण प्राधान्याने उपलब्ध व्हावे, सुरक्षा व्यवस्थेतील महिला पोलीस, अन्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी, महिला पत्रकार इत्यादींसाठी विशेष कक्ष, स्वच्छता गृहांची सकाळी आणि दुपारी साफसफाई व्हावी अशा सूचनाही विधानपरिषद उप सभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.  


या बैठकीस विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) श्री.जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, मा.उप सभापतींचे खाजगी सचिव, श्री.रविंद्र खेबूडकर, विधानमंडळ मुख्य सुरक्षा अधिकारी श्री प्रदीप चव्हाण,अप्पर पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख,डॉ पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे जे रुग्णालय, विशेष शाखेचे श्री.दत्तात्रय कांबळे, पोलीस उपायुक्त श्री प्रवीण मुंडे,मुंबई महापालिकेचे श्री.महेश नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, श्री.विद्याधर पाटसकर, श्रीमती रेशमा चव्हाण आणि श्री.विजय सानप, अग्नीशमन समादेशक अधिकारी श्री.बाळासाहेब पाटील, मध्य रेल्वेचे सहायक परिचालन प्रबंधक श्री.अरुणकुमार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News