नांदेड : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या यंदाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्डने नांदेड येथील साहित्यिक, लेखक डॉ. राम वाघमारे यांना राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात सोमवार दिनांक 8 जुलै रोजी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त ऍड. उज्वल निकम, ऍड. बी.के. बर्वे, सचिव डॉ. वामन आचार्य आदींची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. राम वाघमारे हे श्री शारदाभवन संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असून शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. डॉ. राम वाघमारे हे बालभारती पुणेच्या मराठी भाषा विषयासाठी सदस्य आहेत.
डॉ. राम वाघमारे यांचे 'डोन्ट वरी सर' (कथासंग्रह) 'खेळ', 'ग्रॅपल', लढा', 'गुरुजींची शाळा', 'फाईट फॉर द राईट', इ. कादंबऱ्या व 'दीपस्तंभ' 'ऊर्जास्त्रोत;' 'आक्का'; 'कोहिनूर ए गझल इलाही' इ.चरित्रात्मक पुस्तके आणि 'काकांच्या शैक्षणिक गप्पा' (शैक्षणिक) 'जखमांचे सुगंधी पण जपणारा इलाही' (संपादित) 'समकालीन कादंबरीकार भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे' (समीक्षाग्रंथ), सृजनशील अभियंता पुंडलिकराव थोटवे (चरित्र) इ. साहित्य संपदा प्रकाशित असून त्यांनी 'काळया' व 98% या शैक्षणिक लघु चित्रपटाची निर्मितीही केली आहे. डॉ. राम वाघमारे यांनी अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पुरस्कार देवून गौरवरविण्यात आले आहे.
डॉ. राम वाघमारे यांच्या साहित्य क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मुंबई येथे झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नामांकित अवार्डाने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड मिळाल्याबद्दल सिध्दोधन गायकवाड, दत्ताहरी धोत्रे, संजय नरवाडे, बाबुराव कसबे, मिलिंद चावरे, तानाजी ताटे, मिलिंद व्यवहारे, रवी लोहाळे, अशोक दामोधर, भालचंद्र जोंधळे, प्रा.डॉ. राजेंद्र लोणे, अंकुश सोनसळे, किशोर अटकोरे, भगवान गायकवाड, चंद्रमुणी कांबळे आदींनी डॉ. राम वाघमारे यांचे यांचे अभिनंदन केले असून शैक्षणिक, सामाजिक व साहित्यक्षेत्रातूनही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment