*सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी आज व उदया रोजगार मेळाव्याचे आयोजन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 8, 2024

*सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी आज व उदया रोजगार मेळाव्याचे आयोजन*




नांदेड, ता. 8 जुलै :- जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 9 व बुधवार 10 जुलै 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


 हा मेळावा ग्रामीण टेक्नीकल ॲड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. 


या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 9 व 10 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावेत. या मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News