*किनवट नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव,विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदीची धडक कार्यवाही* *मुख्यधिकारी काकडे ॲक्शन मोडवर* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 12, 2024

*किनवट नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव,विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदीची धडक कार्यवाही* *मुख्यधिकारी काकडे ॲक्शन मोडवर*



 किनवट : किनवट नगर परिषदच्या वतिने  शहारातील शिवाजी महाराज चौक परीसर, मच्छी मार्केट परीसर, जिजामाता चौक परिसरात अतिक्रमण, विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबिविण्यात आली. या मोहिमेअतर्गंत प्लास्टिक बंदी  अनुषंगाने शहारातील दारु भट्टी चालकास ५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. 

       शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक परिसरात वर्षोनुवर्षे असलेले अतिक्रम ण धारक, व्यापारी, फेरीवाले यांचा नाहकत्रास वाहतुकीस, नांगरीकांना होत होता, वारवांर सूचना देऊन सुध्दा अतिक्रमण धारक ऎकत नसल्याले शेवटी धडक मोहीम राबवून अतिक्रमण धारकांचे साहित्य, टेबल, जार, बकीटी, कॅरेट, वजन काटे, विना परवानगी बॅनर, इतर साहित्य जप्तीची कार्यवाही करण्यात आली.

        तसेच मोहिमे अतर्गंत 25 कि.लो प्लास्टिक जप्त करण्यात असून या धडक कार्यवाहीमुळे नगर परिषदेचे मुख्यधिकारी अक्शन मोडवर आले असल्याची चर्चा सामान्य नागरीकांकडुन करण्यात येत आहे. शहरातील व्यापरी, अतिक्रमण धारक,फेरीवाले, विना परवानगी बॅनर धारकांनी यापुढे नगर परिषदेच्या हद्दीत अतिक्रमण करु नये, अतिक्रमण केल्यास अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही अशीच मोहीम सुरु राहील.असे आवाहन देखील केले.

    या मोहिमेत नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मुगाजी काकडे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख अशोक भालेराव, अभियतां विनोद पवार, नगर रचना विभाग प्रमुख स्वानंद मामाडीडवार, क्षेञीय अधिकारी किरण कोलगुटवार,अतिक खान, स.जम्मीर, राजु पिल्लेवार, संदीप ढंडोरे, उमेश ढंडोरे , शेख रियाज, गजानंन गाडेगे, रवी उपरपवार आदि स्वछ्ता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिस उप निरीक्षक सागर झाडे, पोलीस हवलादार वाडगुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News