---------------------------------------
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मिलिंद व्यवहारे यांचा लेख -संपादक
----------------------------------------
नांदेड जिल्हा परिषद ही समग्र ग्रामीण विकासाचा केंद्रबिुंदू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आखून दिलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने काम करतात आणि कामकाजाला गती मिळते. जिल्हाभर होणा-या दौऱ्यामुळे तळागाळातील प्रशासन सजग राहते. तसेच जनतेच्या समस्या कळतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी असे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला नवा आयाम दिला आहे.
मिनल करनवाल ह्या 2018 साली आयएएस झाल्या. त्यांनी देशात 35 वा रँक मिळविला. देहरादून उत्तराखंडमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ अकादमीमधून पूर्ण केले. दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेज मधून बी.ए. केले. त्यानंतर दिल्ली येथून आयएएस होऊन त्या प्रशासनात आल्या.
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल ह्या 22 जुलै 2023 रोजी दाखल झाल्या. आज त्यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानी आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वने प्रशासनात स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा परिषदेकडून विविध महत्त्वपूर्ण योजनांमध्ये कार्यक्षमता वाढवली आहे. शाळा सुधारणा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आणि सामाज कल्याण योजनांच्या कार्यान्वयनात त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे.
त्यांच्या कार्यकाळात प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. आगामी काळात जिल्हा परिषदेला आणखी उंचीवर नेण्यासाठी सीईओ मीनल करनवाल यांनी विविध योजनांची आखणी केली आहे. किनवट व माहूर तालुक्यातील गरोदर माता, स्तनदा माता यांना अमृत आहार योजनेतून सकस आहाराचा पुरवठा, महिला सक्षमीकरण, सुपोषणासाठी प्रोटीन युक्त आहार, शालेय विद्यार्थ्यांना कोडींगचे प्रशिक्षण, प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी, शाश्वत स्वच्छता, ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यावर भर असेल.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या यशस्वी कार्यकालाचे आणि उत्कृष्ट नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या समर्पणाने आणि कार्यक्षमतेने सीईओ मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेला नव्या उंचीवर नेले आहे. आगामी काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद यशस्वी आणि प्रभावी ठरेल, अशी आशा आहे.
त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा!
No comments:
Post a Comment