भोकर ( डॉ. कैलास कानिंदे) : येथील बातमीदार , आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, चित्रकार तथा कलावंत बाबुराव पाटील यांना महाकवी वामनदादा कर्डक व प्रतपसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंती निमित्त "तूफानातील दिवे" पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मागील तीस वर्षांपासून पत्रकारीता, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात आपला वेगळी ओळख निर्माण करून समाज परीवर्तन करणारे ज्येष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांना पहाकवी वामनदादा कर्डक आणि प्रबोधन चळवळीतील शिलेदार प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंती निमित्त यंदाचा "तूफानातील दिवे" पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून शनिवारी ( ता.२४) नांदेड येथील कुसुम सभागृहात सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक तथा नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संजय निवडंगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
क्षेत्र कुठलेही असो त्यात जीव ओतून काम केलं की जिवंतपणा येतो. अशीच खुणगाठ मनी बांधुन पाटील हे मागील तीस ते चाळीस वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत. चित्रकार, पत्रकार, तबला वादक, कवी म्हणून ते सर्वपरिचित आहेत. मागील तीस वर्षांपासून "सकाळ" वृत्तपत्रात तालुका बातमीदार म्हणून ते कार्यरत आहेत. बातम्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांनी लिखाण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून विविध सामाजिक संस्थांनी राज्य, मराठवाडा, जिल्हा स्तरीय शोध आणि विकास, उत्कृष्ट पत्रकारिता पूरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. नुकताच "सकाळ" वृत्तपत्र समुहाने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
त्या पाठोपाट नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संजय निवडंगे आयोजित युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने सामाजिक,पत्रकारीता क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांना "तुफानातील दिवे " पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनीवारी ( ता.२४) नांदेड येथील कुसुम सभागृहात सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.




No comments:
Post a Comment