किनवट : येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुलोचना जाधव यांना समाजशास्त्र विषयातून 'बंजारा समाजातील महिलांच्या पारंपरिक आणि आधुनिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास: संदर्भ नांदेड जिल्हा ' या विषयावर प्रबंध सादर केल्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने नुकतीच त्यांना 'विद्यावाचस्पती' ही पदवी बहाल केल्याबद्दल महाविद्यालयात त्यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यावाचस्पती मार्गदर्शक म्हणून डॉ.सुनिता टेंगसे,कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ यां चे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी मानवी कल्याणासाठी महत्वाची आदिवासी, अतिदुर्गम व डोंगराळ भागात भटकंती करणाऱ्या बंजारा समाजात असलेली उज्वल परंपरा , सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीला माहिती व्हावा यासाठी त्यांनी केलेले संशोधन कार्य प्रेरणादायी आहे. संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजाचे वास्तव त्यांनी या संशोधनातून मांडले आहे.
या संशोधनाबद्दल डॉ.जी.एस.येळणे, डॉ.गजानन मुधोळकर, प्राचार्य डॉ.वसंत सातपूते, डॉ.रामचंद्र भिसे, डॉ.बाबुराव जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे, पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, प्रा. राजकुमार नेमानीवार, प्रा.ममता जोनपेलीवार, डॉ .आनंद भालेराव, डॉ.सुरेंद्र शिंदे, डॉ.शुंभागी दिवे, प्रा आम्रपाली हटकर, प्रा.मंदिकिनी राठोड, प्रा.किशन मिराशे, प्रा.शेषराव माने, डॉ.गजानन वानखेडे , प्रा. स्वाती कुरमे, दिनेश नाईक आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment