*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांना* *'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार जाहीर* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 1, 2024

*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांना* *'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार जाहीर*




मुंबई : राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र विधानपरिषद 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३. ३० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, उपस्थिती, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, कौशल्य, निवडलेले मुद्दे, वक्तृत्व शैली, दर्जेदार उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळून पाहून पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून या पुरस्काराची शिफारस केली जाते. त्यानुसार राष्ट्रकूल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांना 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार जाहीर झाल्याने मागाठाणे विधानसभा मतदारसंघात सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News