पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा -डॉ. संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 4, 2024

पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा -डॉ. संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी

 



नांदेड : नांदेड जिल्हामध्ये अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावात विशेष उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हामधील अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेले अर्धापूर तालुक्यातील पूरग्रस्त गाव शैलगाव (बु) व (खु) ग्रामपंचायत,   येथे भेट देऊन त्या ठिकाणी गावातील स्वच्छता व नाल्यात पाणी तुंबलेल्या गटार वाहत्या करणे. गावातील सर्व स्तोत्राचे TCL द्वारे माहिती करुन घेणे व सर्व पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळे मध्ये पाठविण्यात यावे. नाल्यात बि.एस.सी पावडर किंवा आईल टाकने, गावात धुर फवारणी करायला सांगितले.

     आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांना गावातील घरोघरी सर्व्हेक्षण करून गरोदर मातेला व बालकांना स्तनदा माता, वयोवृद्ध व्यक्तींची गृहभेटी द्वारे माहिती घेऊन  तपासणीसाठी ग्रामपंचायत मध्ये  वैद्यकीय अधिकारी यांनी सुरू केलेल्या ओ.पी.डी मध्ये आजारी रुग्णांना पाठविण्यात यावे असे सूचविले. गावात ओ.पी.डी च्या ठिकाणी आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. सदरील गावात आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत किटक शास्त्रीय  कंटेनर सर्व्हेक्षण करुन एच. आय.बी.आय. नुसार  कार्यवाही व टिमीफास टाकने . गावात मेडोकलोर घरोघरी वाटप करणे.

     गावात अति जोखीमचा व्यक्ती उच्च रक्तदाब, मधुमेह, कुपोषित बालके यांची तपासणी करण्यासाठी ग्राम पंचायत मध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी सुरू केली आहे.

     शेलगाव गावात पूरग्रस्त घरी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व कुटूंबानी काय काळजी घ्यावी या बाबतीत आरोग्य शिक्षण दिले. गावातील पाणी स्तोत्र प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व त्या ठिकाणी TCL  द्वारे शुध्दीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना सांगितले आहे.

     तसेच नांदेड जिल्हमधील मधील एकुण २० पूरग्रस्त गावांमध्ये २४ तास वैद्यकीय आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा यांना आदेश दिले आहे. त्या गावात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा दैनिक अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी डॉ श्रीकांत देशमुख तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर, आरोग्य विस्तार अधिकारी सुनिल गोखले व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News