किनवट : जी माणसं नि:स्पृहपणे लोकांसाठी , लोकांच्या हितासाठी , लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचं आयुष्य, कुटूंब यास बाजूला सारून समर्पक भावनेने स्वःला झोकून देऊन काम करतात ज्ञानोबा बने हे त्यापैकीच एक होत. म्हणूनच सेवापूर्तीच्या निमित्त त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
येथील पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने यांच्या सेवापूर्ती साहेळ्यात अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर भोयर, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, हिमायतनगरचे गट शिक्षणाधिकारी केशव मेकाले, माजी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, अरुणकुमार वतनीवकील, रविंद्र जाधव, नंदकुमार काकडे , मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके , गिरीश नेम्माणीवार उपस्थित होते.
प्रभारी गट शिक्षणधिकारी गंगाधर राठोड यांनी प्रास्तविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पीएम पोषण योजना अधिक्षक अनिल महामुने यांनी आभार मानले. प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवराय , शहीद बिरसा मुंडा , राष्ट्रपिता जोतीराव फुले , क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण केले. त्यानंतर संगीत शिक्षक विशाल शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल, कोठारी ( चि) च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाईले. याप्रसंगी सुधाकर भोयर , माजी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने , अरुणकुमार वतनीवकील , सह. शिक्षक मोरे, केंद्रप्रमुख शंकर वारकड , मुख्याध्यापक मोहन जाधव , सोपानराव बने , नाना कोनाले, प्रा. रेखा बावचकर यांनी मनोगत व्यक्त केले. बी.आर. इंदूरवार यांनी पाळणा गाईला.
गट शिक्षणधिकारी पदावरून नियतवयोमानाने सेवानिवृत्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते ज्ञानोबा रामनाथ बने व त्यांच्या सुविध पत्नी अहिल्यादेवी यांचा शाल, महापुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक व कार्यालयीन सर्व कर्मचारी यांनी भेटवस्तू देऊन त्यांना सन्मीत केले. यावेळी अभियंता प्रशांत ठमके यांनी उपस्थित सर्वांना पंचपक्वान्नाचं भोजनदान दिलं.
एम.के.टी. शाळेच्या गेट पासून उघड्या जीपमध्ये श्री बने यांची लेझीमपथकासह मिरवणूक काढण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या एन.सी.सी. पथकाने त्यांना गॉड ऑफ ऑनर दिला .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड , बालाजी मोकळे , शोभा भारती , वैशाली आडगावकर , मनीषा बडगिरे , मुख्याध्यापक ना.ना. पांचाळ , केंद्र प्रमुख रमेश राठोड, ग.नु. जाधव , जगदीश कोमरवार , रमेश खुपसे , चंद्रशेखर सर्पे, मारोती भोसले , बाबूराव इब्बितदार , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास जुनगरे, उपमुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर, प्रफुल डवरे , एम.के.टी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एस. व्ही. रमणराव, यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास तालुक्यातील केंद्र प्रमुख , मुख्याध्यापक , शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment