मलकजाम येथील उपक्रमशील शिक्षक नविनरेड्डी येनगोड यांना बीटस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 ने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा राजा तामगाडगे यांचा प्रासंगिक लेख येथे देत आहोत -संपादक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलकजाम येथील भाषा विषयाचे विषयशिक्षक तथा मुख्याधापक नविनरेडडी यांना शिवणी बीटस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 विशेष समारंभात माजी गट शिक्षणधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने यांच्या हस्ते व जलधरा भूमीचे भूमीपूत्र माजी डीवायएसपी उत्तमराव पाचपूते यांच्या उपस्थितीत 5 सप्टेबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जंयतींच्या अनुषंगाने शिक्षकदिनी विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.
उपक्रमशील शिक्षक नविनरेड्डी मोहनरेड्डी येनगोड हे हाडाचे शिक्षक आहेत त्यांचे वडिल सुद्धा शिक्षक होते. त्यांचे वडील मोहनरेड्डी येनगोड यांनी किनवट तालुक्यातील जिल्हा परिषदे शाळेसाठी सेवा दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंचली (ई ) येथे नियत वयोमानानुसार निवृत्त होऊन ते आज सुखासमाधानाचे आयुष्य जगताहेत. स्वतः दिव्यांग असून सुद्धा कमीपणा न बाळगता निडरपणे येणाऱ्या समस्येला तोंड देऊन आपली मुले शिकतील, घडतील याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले होते.
त्यांचा ज्येष्ठ मुलगा म्हणजे नविन रेड्डी . नविनरेड्डी मुळातच हुशार वृत्तीचा . एचएचसी च्या २००० बॅचमध्ये कला शाखेतून सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळा किनवट येथून ते 77.83% गुण मिळवून किनवट तालुक्यात प्रथम आल होते. त्याकाळी डीएड कडे विशेष कल होता. पहिल्या यादीतच नविनरेड्डी यांची अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालय यवतमाळ येथे निवड झाली. डी. एड. पूर्ण करून सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणबूर ता. पाटण येथे 2017 पर्यंत त्यांनी कार्य केले.
नंतर त्याची आंतरजिल्हा बदली झाली व आपल्या जन्मभूमीची सेवाकरण्यासाठी त्यांनी किनवट तालुका निवडला. अतिदूर्गम अवघड क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळझरा येथे 17/07/2017 ते 06/09/2019 पर्यंत ते कार्यरत होते. या कालावधीत शाळेतील इतर शिक्षकांच्या मदतीने शाळेचा चेहरामोहरा त्यांनी बदलून टाकला . याचे साक्षीदार गावातील नागरीक जसे आहेत तसेच प्रशासनातील कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे त्या वेळचे बीटचे विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे सुद्धा आहेत. त्यांच्या कामावर खूष होऊन पाठीवर शाबासकीची थाप देऊन शाळेला पाचशे रुपयाचे बक्षीस त्यांनी दिले होते .
नंतर विषय शिक्षक पदोन्नतीने भाषा शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलकजाम येथे ते रुजू झाले. अन् मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्विकारला. त्यावेळी इयत्ता पहिली ते सातवी असलेल्या शाळेत फक्त ते एकटेच कार्यरत होते. तत्कालीन शिक्षक एस.एस. पाटील हे सामाजिक शास्त्र विषयशिक्षक बदलीने पाथरी केंद्र खंबाळा येथे गेल्यामुळे त्यांनी एकहाती कारभार सांभाळला . लागलीच सपूपदेशनाने आमचीही ( राजा तामगाडगे) नेमणूक शासनाने कंम्पलरी शाळा म्हणून मलकजाम येथे केली.
'एक से भले दो' म्हणून तक्रार, कुरबुर न करता गावगाड्याला सोबत घेऊन सहकारी शिक्षकांसमवेत शाळा पुनर्रचना करण्यास सज्ज झाले. भाषीक, शैक्षणीक , विद्यार्थी गळती , अनुपस्थिती या सर्व समस्येला तोंड देत होतकरू गरीब वंचिताच्या मुलांमुलीच्या शिक्षणासाठी समानतेची भूमिका ठेऊन उपक्रम राबविण्यास सुरवात केली. प्रथमतः गावातील लोकांचा विश्वास संपादन केला. शाळेचे अतरंग व बाह्यरंग बदलवले. .शाळा पूर्वीच डिजीटल होती. त्याच्या वापरात सातत्य आणले. मुले इंग्रजी बोलतील यासाठी Monday English Day उपक्रम राबविला. शाळेतील ग्रंथालयाचा वापर मुले नियमित करावीत यासाठी ‘ज्ञानज्योती बूक संग्रहालय’ अध्ययावत केले. मुले दहा टॅबलेट चा वापर करून तंत्रस्नेही बनताना दिसून येतात. शाळेत मंत्रिमंडळ असून मुलामध्ये विविध पदाचे वाटप करण्यात आले आहे. नविन रेडी यांच्या कार्यकाळातच सर्व वर्गखोल्यांत टाइल्स, अंगणात पेव्हर ब्लॉकचे काम झाले. शिक्षणासोबत खेळाकडे त्यांचे विशेष लक्ष असते. म्हणून मुले विविध खेळांचा सराव सातत्याने करतात. आजरोजी या दोन शिक्षकांना चेतन तोटावार या उपक्रमशील शिक्षकाची साथ मिळाली असून शिवणी बीटचे विस्तार अधिकारी (शिक्षण) संजय कराड , केन्द्रप्रमुख सत्यनारायण कौड, केन्द्रीय मुख्याधापक प्रमोद रत्नाळीकर यांच्या मार्गदर्शनात शाळा विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करित आहे . त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा आहे परंतु इमानेइतबारे काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकाच्या जीवनात ऊर्जा देणारा हा नक्कीच ठरेल ! इतकेच.
-राजा तामगाडगे ,
(प्राथमिक शिक्षक) ,
जि.प.प्रा. शा. मलकजाम
(9552629897)
No comments:
Post a Comment