भोकर तालुक्यात कळी खुडली ; पोक्सो ऍट्रासिटीसह गुन्हा नोंदवून पोलीसांनी घेतले आरोपीस ताब्यात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 9, 2024

भोकर तालुक्यात कळी खुडली ; पोक्सो ऍट्रासिटीसह गुन्हा नोंदवून पोलीसांनी घेतले आरोपीस ताब्यात

 


 भोकर :  तिसऱ्या इयत्तेत शिकत असलेल्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोक्सो व ऍट्रासिटीसह गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. 

          तालुक्यातील ग्रामीण भागात एका तरुणा कडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे 

        याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील एक कष्टकरी महिला कामावरून  घरी आल्यावर आपली  मुलगी ( वय  ९ वर्षे) घराच्या कोपऱ्यात बसून असल्याचे पाहिले. तेव्हा  आईने विचारल्यानंतर मुलीने सांगितले की, काकाच्या घरी खेळण्यासाठी गेली होती परंतू काकाचे घर बंद होते. म्हणून ती परत आपल्या घराकडे येत होती. तेंव्हा काकाच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका इसमाने तिला माझे दुकानातुन सामान आणून दे म्हणून आपल्या घरात नेले आणि दार बंद केले व अत्याचार  केला. एवढेच नाही तर ही बाब आईला सांगितली तर आईची हत्या करेन अशी धमकी त्याने दिली. मात्र तिने आईला हा सारा प्रकार सांगितल्यानंतर आईच्या तक्रारी वरून भोकर पोलीस ठाण्यात पोक्सोसह ॲट्रासिटी ॲक्ट भारतीय न्यायिक संहिता ( बी एन एस ),२०२३ -६५(२) ,भारतीय न्यायिक संहिता ( बी एन एस ), २०२३ - ३५१ (१) ,भारतीय न्यायिक संहिता ( बी एन एस ), २०२३ - ३५१ (३) ,बालकांचे लेंगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ -४ ,लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, ६ ,बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२-१२, अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(१)(w)(i),अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(१)(w)(ii) ,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(२) नुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

      मोबाईल लोकेशन वरून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी डॅनिअल बेस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड , सहायक पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र औटे , पोलीस उप निरीक्षक राम कराड , जमादार नामदेव जाधव , पोहेकाँ भीमराव जाधव , पोलीस कर्मचारी सी.जे. कळणे , मंगेश क्षीरसागर , आर.जे. कळणे , परमेश्वर गाडेकर यांनी मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News