जि. प. हायस्कूल हुंडा गंगापट्टी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व महावाचन उत्सव " विविध उपक्रमांनी साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, September 20, 2024

जि. प. हायस्कूल हुंडा गंगापट्टी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व महावाचन उत्सव " विविध उपक्रमांनी साजरा

 



उमरी (नांदेड) : तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल  हुंडा गंगापट्टी शाळेत  "77 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व महावाचन उत्सव " विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

            मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी शालेय प्रभातफेरी काढून ,ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले.

        नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत "महावाचन उत्सव 2024"  उपक्रम  राबविण्यात आला.

          *सदरील उपक्रमांतर्गत  अवांतर वाचनाचे पुस्तक वाचून त्याचे सारांश लेखन विद्यार्थ्यांनी करावयाचे होते, सदरील  सारांश कॉपी महावाचन पोर्टल ला अपलोड केले असता संबंधित विद्यार्थ्यांना वाचनास प्रेरणा म्हणून मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या सहीचे प्रमाणपत्र पोर्टल च्या माध्यमातून  76 विद्यार्थ्यांना मिळाले*.

         *सदरील प्रमाणपत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सरपंच गंगाबाई राक्षसमारे, उपसरपंच शोभाबाई मिरगूडवाड, तंटामुक्ती अध्यक्ष  मारोती पाटील, ग्रामसेवक श्रीमंगले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  विलास कुमरे, सदस्य संभाजी तगुरवाड, अकबर शेख व ग्राम पंचायत सर्व सदस्य, शंकर पा. थेटे, भुजंग पा.थेटे, गोविंद पा.थेटे, विजय राक्षसमारे, मुख्याध्यापक एन. पी. नागशेट्टी व सर्व शिक्षक- शिक्षिका, अंगणवाडीताई, मदतनीस, माता- पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले.

       "*महावाचन उत्सव 2024" या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमात सहभाग होऊन ,पुस्तकांशी दोस्ती करून, पुस्तकांचा सहवास, जगाचा प्रवास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक उमरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी  नंदकुमार कुलकर्णी , शिक्षण विस्तार अधिकारी  देविदास नारमोड, ढोलउमरी केंद्राचे मुख्याध्यापक एम. सी. पवार  यांनी भ्रमणध्वनी वरून केले. तसेच पुढील वाचन प्रवासास शुभेछ्या दिल्या.

          शाळेच्या कार्यक्रमात भाषणे, स्वच्छता शपथ, मराठवाडा  गौरवगीते, मान्यवरांचे मनोगत झाले. शाळेसाठी नवीन इमारत,  क्रीडांगण तयार करणे, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांचे सहीचे स्वतः च्या नावाचे प्रमाणपत्र पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

      सदरील उपक्रम राबविणारे शाळेतील शिक्षक अनिल कांबळे, आनंद गुंडाळे, प्रल्हाद जोंधळे, नळगिरे, व्यंकटी जाधव, बाळासाहेब शिंदे, संध्याराणी लोकडे, सुलक्षणा स्वामी, लोकडे, वंगरवार, श्रीमती वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविकआनंदा कांबळे व सूत्रसंचालन मनोज बारसागडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News