भोकर (जयभीम पाटील / डॉ. कैलास कानिंदे) : मागील तीस ते चाळीस वर्षांपासून शहरातील डॉ.आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमण संदर्भात अनेक संघर्ष करावा लागला. अखेर प्रशासनाने शनिवारी (ता.२१) सदरील अतीक्रमण हटवल्याने आंबेडकरी बांधवांकडून प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे.
शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथे मागील चाळीस वर्षांपासून आंबेडकरी बांधवांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यासाठी जागेची आखणी केली आहे. सदरील परिसरात काही व्यापाऱ्यांनी त्या जागेवर अतिक्रमण करून व्यापार सूरू केला होता. याबाबत प्रशासनास लेखी तक्रार करून अतिक्रमण हटविण्यात यावे , अशी मागणी केली असता दूकानदारांनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने तो प्रश्न"जैसे थे " ठेवण्यात आला होता. आंबेडकरी समाज बांधवांनी अनेकदा आंदोलने करून मागणी रेटून धरली होती. तरी यावर तोडगा निघाला नाही. आखेर छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयाने अतिक्रमणं हटविण्यात यावे असा निर्णय दिल्याने शनिवारी येथील नगरपालिका, पोलीस, महसूल विभागाने सदरील अतिक्रमण हटविले आहे. चाळीस वर्षाच्या संघर्षानंतर न्याय दिल्यामुळे आंबेडकरी बांधवांनी शासनाचे अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment