आदिवासी तालुक्यातील 'बजरंग'च्या तिघींची कमाल ; जिल्हास्तरीय कुस्तीत दाखवली चितपटाची धमाल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, September 21, 2024

आदिवासी तालुक्यातील 'बजरंग'च्या तिघींची कमाल ; जिल्हास्तरीय कुस्तीत दाखवली चितपटाची धमाल

 

किनवट : तालुक्यातील पाटोदा ( खु) येथील बजरंग माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत  प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या तिन्ही विद्यार्थिनींचा व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक भास्कर जाधवर यांचा सत्कार‌ करतांना मुख्याध्यापक संजय केंद्रे‌, शिक्षक के.बी.खाडे, राहूल कोल्हे, रविंद्र काटोके, मुंडेसह शिक्षकेत्तर कर्मचारी .


किनवट : अतिदूर्गम,  आदिवासी तालुक्यातील सीमावर्ती पाटोदा (खुर्द) येथील बजरंग माध्यमिक विद्यालयातील तीन विद्यार्थिनींनी नांदेड येथे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.



         तालुकास्तरावर अव्वल ठरल्यानंतर नांदेडच्या  गुरुगोविंदसिंघजी स्टेडीमयम जवळील इनडोअर हॉल मध्ये नुकत्याच जिल्हा स्तरावरील स्पर्धेत तालुक्यातील पाटोदा (खु) येथील  बजरंग माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी  सुप्रिया अरविंद राठोड (57 किलो वजन गट), वैष्णवी संजय राठोड ( 49 किलो वजनगट ) व सपना नारायण जाधव ( 61 किलोवजन गट) सहभागी झाल्या होत्या.



      यावेळी त्यांनी वेगवेगळे डाव टाकत मिनीटाच्या आत प्रतिस्पर्धी खेळाडूस चित्रपट करून तिघींनीही  वेगवेगळ्या वजन गटातून  जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे त्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी  निवड झाली आहे. त्यांना क्रीडा शिक्षक  बी. एल जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. संस्थेचे अध्यक्ष सोपानराव केंद्रे , सचिव प्रा. डॉ. गोवर्धन लांब व संस्था कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य तसेच गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड , शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली आडगावकर , केंद्रप्रमुख रमेश राठोड , मुख्याध्यापक  संजय केंद्रे आदींसह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News