माकणी (धाराशीव) : येथील भारत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मुलांच्या कबड्डी संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या आंतर महाविद्यालयीन धाराशिव झोनल कबड्डी स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळाला आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व जवाहर महाविद्यालय आणदुर यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव झोनल कबड्डी स्पर्धा (मुले - मुली) दिनांक 28/09/2024 श्री तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आठ महाविद्यालयांच्या संघाने सहभाग नोंदविला होता. बी. एस .एस.कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कबड्डी पटूने तिन्ही सामान्यात अगदी एकतर्फी विजय मिळवून सर्वसाधारण विजेतेपदावर कब्जा मिळविला अंतिम सामन्यात सुद्धा माकणी कॉलेजच्या कबड्डीपटूने नळदुर्ग कॉलेजच्या संघावर सहज मात करत आपले वर्चस्व सिद्ध केले. माकणी महाविद्यालयाचा ऑलराऊंडर असलेला कबड्डीपटू युवराज बेलेनुर हा उत्कृष्ट खेळाडू ठरला. युवराजने अत्यंत संयमी व उत्कृष्ट खेळाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.
आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांसाठी तांत्रिक समितीमध्ये प्रा. डॉ.रमेश पात्रे , प्राचार्य डॉ. सय्यद चाऊस, डॉ. उमाकांत सलगर यांचा समावेश होता. तसेच पंचांच्या भूमिकेमध्ये प्रा.सोनटक्के, प्रा.परघणे, प्रा. चव्हाण , प्रा.डॉ. इंगळे, प्रा. डॉ. ए.सी. पाटील आदींनीनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. पडवळ उपस्थित होते. प्रा.जाधव, प्रा. चेंडके , प्रा. डॉ. बावीकर, प्रा. डॉ. गणापुरे, प्रा. बालाजी ससाने (वनविभाग), प्रा. ऋषिकेश घोडके (राष्ट्रीय खेळाडू) आदींच्या उपस्थितीत या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.
महाविद्यालयाच्या या विजेत्या कबड्डीपटूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. अनिल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे, जनार्दन अण्णा साठे (सरचिटणीस भारत शिक्षण संस्था), पद्माकरराव हराळकर (चिटणीस भारत शिक्षण संस्था), डॉ. वाघमोडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ.धनाजी थोरे, कार्यालयीन अधीक्षक किशोर जगताप, संतोष सोमवंशी, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





No comments:
Post a Comment