पुणे : येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात नांदेड जिल्ह्यातील दोन शिक्षकांना दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदबोरी (चि) येथील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक नितीन संभा सावरगावे यांनी परिसर अभ्यास या विषयातील इयत्ता पाचवीतील पृथ्वीचे फिरणे या पाठावर व बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील शिक्षक प्रमोद प्रतापराव भंडारे यांनी इयत्ता ९ वी १० वी च्या सामाजिक शास्त्रे या विषयावर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केल्याबद्दल ₹ 30,000 रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती अंगमो कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब, राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला तसेच नांदेडचे भूमिपुत्र तथा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती होती.






No comments:
Post a Comment