किनवट : स्वामी रामानंद तीर्थ मराडवाडा विद्यापीठ नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत तालुक्यातील कनकवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संघांनी यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने 14 वर्षाखालील मुले आणि मुलींच्या संघास जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होता आले.
यावेळी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराडवाडा विद्यापीठाच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत आदिवासी डोंगरी तालुक्यातील कनकवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 14 वर्षे वयोगटाखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कनकवाडी शाळा ही जिल्हास्तरावर किनवट तालूक्याचे प्रतिनिधित्व करत आहे. कनकवाडी आदिवासी बहुल गावाचे नाव जिल्हास्तरावर लौकिक केल्याबद्दल गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य , सर्व शिक्षणप्रेमी नागरिक तसेच गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड , पीएम पोषण आहार अधिक्षक अनिल महामुने , शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा बडगिरे , केंद्र प्रमुख गंगाधर पुलकंटवार , मारेगाव (व) केंद्राचे मुख्याध्यापक रमेश खुपसे , जि.प.प्रा.शाळा कनकवाडीचे मुख्याध्यापक शेख इब्राहीम , सर्व सहशिक्षक विनायक मुंडे, गायकवाड , कोटरंगे, गडुमवाड व पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment