नांदेड : गुरुवर्य स्मृतीशेष एम.पी. भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, बहुजन टायगर युवा फोर्स (सांस्कृतिक विभाग) महाराष्ट्र राज्य व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ पोटा बु. च्या वतीने गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती पुरस्कार वितरण व पारंपारिक कलावंत शाहीर मेळावा दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोज सोमवारी पोटा बु. ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून, समाजातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना दरवर्षी गुरुवर्य एम.पी. भवरे कामारीकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये खालील व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे.
अभि. अशोक भोजराज (जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प. नांदेड), गजानन सुर्यवंशी (मु.अ. कै. श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम बु.), सौ. वंदना समाधान सुर्वे, तातेराव बाळू वाघमारे, धम्मा धोत्रे (ग्राम विकास अधिकारी), विजय चव्हाण (ग्राम विकास अधिकारी, कामारी), सुधाकर कदम (पोहेकॉ.), गजानन पोतलवार (वनरक्षक), सुनील रामदासी (पत्रकार), मधु बावलकर (गझलकार, आदिलाबाद), प्रा. गजानन सोनोने, इंजि. आनंद भिसे, डॉ. माधव विभूते, जे.डी. भदेवाड (कृषी अधिकारी) आणि प्रताप लोकडे (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा हिमायतनगर) आदींना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे, पुरस्कार निवड समिती प्रमुख सेवानिवृत्त सहाय्यक वन संरक्षक के.डी. देशमुख बारडकर, यशवंत थोरात, लक्ष्मणराव भवरे यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.
स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी. भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, बहुजन टायगर युवा फोर्स व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ पोटा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने पोटा बु. ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोज सोमवारी सकाळी 10 ते 1 या दरम्यान लोकपारंपारिक कलावंत शाहिरी मेळावा व दुपारी 1 वाजता गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून एस.जी. माळोदे (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड) तर अध्यक्षस्थानी आ. माधवराव पाटील जवळगांवकर, विशेष अतिथी म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा. नागेश पाटील आष्टीकर तर प्रमुख उपस्थितीत डॉ. संजय तुबाकले (प्रकल्प संचालक, जि.प. नांदेड), सत्येंद्र आऊलवार (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नांदेड), बी.एन. ठाकूर (सहाय्यक वनसंरक्षक, नांदेड), सौ. पल्लवी टेमकर (तहसीलदार, हिमायतनगर), पी.एम. जाधव (गटविकास अधिकारी, हिमायतनगर), अमोल भगत (पोलिस निरीक्षक हिमायतनगर), विजय कांबळे (उप अभियंता, जि.प. उपविभाग हदगाव), इंजि. दिलीप धुळेकर, पुंडलीक माने (कृषी अधिकारी, जि.प. नांदेड), केशव मेकाले (गटशिक्षणाधिकारी, हिमायतनगर), बालाजी चव्हाण (वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर), दिलीपराव कावळे, विवेकानंद येरेकार, प्राचार्य प्रताप नरवाडे, दिलीप जाधव (कृषी अधिकारी), नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार परमेश्वर गोपतवाड, स्वागताध्यक्ष रफिक भाई (माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर) निमंत्रक कैलासभाऊ माने पोटेकर, कानबा पोलपवार, दत्ताभाऊ पवार, निवेदक उत्तम कानिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण व लोकपारंपारिक कलावंतांचा शाहीरी मेळावा होणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे, नागोराव मेंडेवाड, शिवाजी डोकळे, परमेश्वर वालेगावकर, केशव माने, नागनाथ वच्चेवाड, पांडूरंग मिरासे, शाहीर रमेश नार्लेवाड, शाहीर बापूराव जमदाडे, सुमेध एडके, पत्रकार विजय वाठोरे, शाहीर शंकर गायकवाड, जळबा जळपते, सुभाष गुंडेकर, गौतम राऊत, बालाजी राऊत, शेख खय्युमभाई, जयभीम पाटील, किरण वाघमारे, डॉ. मनोज राऊत, बळीराम जाधव, सचिन कांबळे, अविनाश कदम, किशनराव ठमके आदींनी दिली आहे.
No comments:
Post a Comment