*नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द* *रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, October 10, 2024

*नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द* *रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा*



नांदेड ता. १० ऑक्टोबर : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे आज दिनांक 10 रोजी गुरुवारी होणाऱ्या महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने पुढे केला आहे. कार्यक्रमाबाबत नवीन तारीख, वेळ, स्थळ लवकरच जाहीर केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.


   श्री.रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील,असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे .या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे नांदेड येथील मोंढा मैदानावर आज दुपारी होणारा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यक्रम नेमका कधी होईल हे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन ठरविण्यात येईल व त्याबाबतचे अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


 जिल्ह्यातील समस्त जनतेने विशेषता महिला भगिनींनी याची नोंद घ्यावी. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल.


*आज 10 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर*

                                                                                                                                                                                                                        नांदेड दि. 10 ऑक्टोबर : जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन बुधवार 9 ऑक्टोबर 2024 रोजी झाले आहे. त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहिर केला आहे.  

                                  

दुखवटयाच्या दिवशी 10 ऑक्टोंबर 2024 रोजी ज्या इमारतीवर दररोज नियमित राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर चढविण्यात यावा. या दिवशी कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News