बेलामंडल /जिल्हा आदिलाबाद / तेलंगणा ( गजानन खोब्रागडे) : बेला मंडल केंद्रातील आंबेडकर कुडाळी येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस अशोक विजयादशमी निमित्त बहुजनांच्या वतीने आयोजित भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी शंकर नरंजणे आणि सलाम देवाराव यांचे हस्ते पंचरंगी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्रिशरणम, पंचशील घेण्यात आलेले. तथागत सम्यक सम्बुद्ध यांच्या रूपास व डॉ. बाबासाहेब आंबेडकरां यांच्या प्रतिमांची धुप ,दीप व पुष्पापूण ज्ञानपुजा करण्यात आली. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आज अशोक विजयादशमी, कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्याचा विजयादशमी दिवस आहे. आजच्याच दिवशी सम्राट अशोक म्हणाले होते की , आपण युद्ध करणार नाही आणि सर्व शस्त्रे बुद्धाच्या पायावर ठेवली आणि श्रीमंत-गरीब आणि जात भेद न करता प्रेम, मानवतेचा पाया घालणाऱ्या बौद्ध धम्माचा स्विकार केला. त्यानंतर नागभूमी नागपूर येथे आजच्याच विजया दशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी पाच लाखाहून अधिक अनुयायांना धम्मदीक्षा दिली. म्हणून आजच्या दिवशी सर्वत्र धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. असे मान्यवरांनी विचार मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या आशेच्या अनुषंगाने, मंडल केंद्र तसेच खोगदूर, दहेगाव, कांगारपूर आणि माजरा या गावांमध्ये सर्वांनी 68 वा धर्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमात आंबेडकर वडिसू, दीपक कांबळे, दुर्वास गौंडे, भाविक देवतळे, के. गणेश, के.अजय, विनोद आदी सहभागी झाले होते.






No comments:
Post a Comment