मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार झाला. दोन ते तीन राउंड त्यांच्यावर फायर करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांनी दिली.
वांद्रे निर्मल नगर परीसरात हा गोळीबार झाला. त्या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे. दोन ते तीन राउंड त्यांच्यावर फायर करण्यात आले होते. बाबा सिद्दिकी यांच्य छातीला गोळी लागलेली होती.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार व मोहित कंबोज हे देखील या रुग्णालयात दाखल झाले आहेत. लिलावधी हॉस्पिटल जवळ मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी या गोळीबाराची चौकशी करुन फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्याचे संकेत दिले. बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सक्षम आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लिलावती रुग्णालयात दाखल होऊन तेथील माहिती घेतली. बाबा सिद्दिकी हे नुकतेच काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील झाले होते. त्यांच्या हत्येच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.




No comments:
Post a Comment