किनवट : येथील गटसाधनकेंद्रात शब्द सुरांचा संगम "गीतकाव्य दीपोत्सव २०२४ " कार्यक्रम हर्षोल्हासात संपन्न झाला. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ (नोंदणीकृत) तालुका शाखा किनवट -माहूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर , उद्घाटक मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूलचे प्राचार्य तथा चित्रपट दिग्दर्शक एस.व्ही. रमणराव व प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सचिव शेषराव पाटील आणि वामनदादा संगीत अकादमीचे संस्थापक सुरेश पाटील उपस्थित होते.
प्रथम सत्रात निमंत्रीतांचे कवीसंमेलन 'काव्योत्सव ' आणि दुसऱ्या सत्रात कराओके गीतगायन 'गीतोत्सव ' घेण्यात आला. जिल्हा सचिव रुपेश मुनेश्वर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे यांनी आभार मानले.
यावेळी भूमय्या इंदूरवार, सूर्यभान कंधारे, पांडुरंग शेरे, संजय जाधव, मुन्ना थोरात, प्रणाली कांबळे, रमेश पडगिलवार, गणेश येरकाडे, कुणाल राठोड, सतीश राऊत, आम्रपाली वाठोरे, व्ही.ए. जमादार, किशन परेकार, कामराज माडपेल्लीवार, गंगाधर कदम आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किनवट तालुकाध्यक्ष रामस्वरूप मडावी यांचे सह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment