मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी -निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, November 15, 2024

मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी -निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे)



किनवट : सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान  अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक नियम व सूचनांचे  काटेकोरणे पालन करून , कुठल्याही शंका मनात न ठेवता त्याचे निरसन करून विधानसभा निवडणून निर्भिड , निष्पक्ष , मुक्त वातावरणात यशस्वीपणे पार पाडावी. असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.


     मातोश्री कमल ताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल,  कोठारी (चि ) येथे आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 करिता नियुक्त  मतदान केंद्राध्यक्ष , प्रथम व इतर मतदान अधिकारी यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षणात त्या मार्गदर्शन करतांना  बोलत होत्या.

किनवटच्या तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना


     यावेळी किनवटच्या तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे तहसिलदार तथा सहायक  निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव व किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनीही अनुक्रमे टपाली मत प्रक्रिया , अभिरूप मतदान (मॉकपोल) व ऍप्स बद्दल माहिती दिली.

माहूरचे तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना

     प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे सहायक अधिकारी मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी मतदान केंद्रावर मतदान घेतानाच्या प्रत्येक टप्प्याची, मतदान यंत्राची, सर्व निवडणूक लिफापे व कागदपत्रे भरण्याची इत्यंभूत माहिती पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन (पीपीटी) द्वारे दिली. याकरिता संगणक चालक तथागत पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. तसेच  मास्ट्र ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी यांनी इव्हीएम बद्दल माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रत्येकी 40 प्रशिक्षणार्थी करिता एक वर्ग खोली याप्रमाणे क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी सर्वांना मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक व नमुने भरण्याचा सराव अभ्यास घेतला.

किनवट : मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांना पीपीटी द्वारे निवडणूक प्रशिक्षण देतांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे


        प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी 809 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांपैकी 766 हजर व 43 गैरहजर होते ; तर दुसऱ्या दिवशी 684 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांपैकी 640 हजर व 40 गैरहजर होते. अशाप्रकारे दोन्ही दिवशी 1 हजार 493 पैकी 1 हजार 406 हजर व 87 जण गैरहजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

         कक्ष प्रमुख नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे, सर्व  नायब तहसिलदार म. रफिक म. बशिरोद्दीन, विकास राठोड , आर.जी. राठोड , कैलास जेठे , महसूल विभागाचे के.डी. कांबळे, डी.सी.भुरे, नरेश रोडे, प्रभू पानोडे, एन.एस. शिंदे, गोविंद पांपटवार तसेच प्रशिक्षण कक्षाचे सहायक अधिकारी / कर्मचारी :  व्ही.टी. सुर्यवंशी, मुकेश कोल्हे , ए.जे. बोडकेवाड, बी.एल. काळे, रामदास शेंडगे, एम. के. सांगवीकर, डी.जी. क्षीरसागर, अमोल सुर्यवंशी, गणपत बोडके, शुभम राठोड, रवीदास आडे , कोमल भगत, गिता प्रधान आदिंनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News