किनवट : 83- किनवट विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचेसाठी अत्यंत उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्या जात असून निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांनी सर्व नमुने भरून घेण्याचा सराव अभ्यास हा अनोखा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. असे गौरोद्गार निवडणूक निरिक्षक (सामान्य) शैलेंद्र कुमार (भाप्रसे) यांनी काढले.
मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल , कोठारी (चि) येथे 83- किनवट विधानसभा मतदार संघाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणास भेटी प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी त्यांचे पुष्पगुच्छ पगुच्छ देऊन स्वामत केले. यावेळी किनवटच्या तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव व किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे व मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की , स्वातंत्र्याच्या 72 वर्षीनंतर प्रथमतःच अतिदूर्गम वाघदरी गावात मतदान केंद्र देण्याचं महत्वपूर्ण काम सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले आहे. त्यांच्या नियोजनात आपणास उत्तम प्रशिक्षण दिलं जात आहे. आपण सर्वांनी इव्हीएम मशीन्स वारंवार हाताळाव्यात व मनात कसलीही भिती , शंका न बाळगता निर्भयपणे , मुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी.



No comments:
Post a Comment