किनवट : तालुक्यातील सीमावर्ती , अतिदूर्गम , डोंगरी आदिम वस्ती घोगरवाडी येथे सोमवारी (ता.18) रात्री निवडणूक निरिक्षक(सामान्य) शैलेंद्र कुमार (भाप्रसे) यांनी भेट देऊन सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा , असे आवाहन केले.
83- किनवट विधानसभा मतदार संघातील तालुका मुख्यालयापासून पूर्वेस सुमारे 13 किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा सीमेलगत डोंगरी अतिदूर्गम घोगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या 198 क्रमांकाच्या मतदान केंद्रांस सोमवारी (ता.18) रात्री निवडणूक निरिक्षक (सामान्य ) शैलेंद्र कुमार (भाप्रसे) यांनी भेट दिली. त्यानंतर तेथील चौकात गावकऱ्यांसमवेत गोण्यावर बसून मतदारांशी संवाद साधला. लोकशाहीला प्रगल्भ करण्यासाठी सर्व मतदारांनी बुधवारी ( ता. 20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे कळकळीचे आवाहन केले.





No comments:
Post a Comment