सर्व मतदारांनी मतदानाद्वारे आपला हक्क आणि कर्तव्य बजावून आपली लोकशाही समृध्द करावी -कावली मेघना (भाप्रसे) #विधानसभा निवडणूकीसाठी किनवटमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, November 19, 2024

सर्व मतदारांनी मतदानाद्वारे आपला हक्क आणि कर्तव्य बजावून आपली लोकशाही समृध्द करावी -कावली मेघना (भाप्रसे) #विधानसभा निवडणूकीसाठी किनवटमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज


किनवट ( निवेदक कानिंदे) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 83-किनवट विधानसभा मतदारसंघात बुधवारी (ता.20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान 331 मतदान केंद्रावर राखीव यंत्रासह 397 नियंत्रण युनिट, 794 बॅलेट युनिट व 430 व्हीव्हीपॅट मतदान यंत्राद्वारे निर्भय, निःपक्ष व मुक्त वातावरणात मतदान घेण्यासाठी 706 पोलिस अधिकारी -कर्मचा­यांच्या तैनातीसह तीन हजारांहून अधिक अधिकारी कर्मचारी यांचेसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांनी सांगितले.


                किनवट व माहूर या तालुक्याचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात 1 लाख 42 हजार 273 पुरुष, 1 लाख 36 हजार 381 स्त्री व 11  ईतर असे एकूण 2 लाख 78 हजार 665 मतदार आहेत. 331 मतदान केंद्रापैकी सार्वजनिक बांधकाम उप विभाग क्र. 2 खोली क्र. 2 येथे एक दिव्यांगासाठी आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथे एक महिला  मतदारांसाठी  व स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर प्रथमच अतिदूर्गम वाघदरी येथे एक एंग बुध मतदारांसाठी असे 3 स्वतंत्र  मतदान केंद्र  आहेत. दिव्यांगासाठीच्या सुलभ निवडणुका अंतर्गत तिथे सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत. एक मतदान केंद्र संवेदनशील असून येथे केंदीय राखीव दल तैनात केले आहेत. तसेच येथे सूक्ष्म निरीक्षक राहणार आहेत. या केंद्रासह 166 मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया (मतदान अधिकारी तीन पर्यंतची) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन थेट प्रक्षेपित होणार आहे.

किनवट : 83- किनवट विधान सभा मतदार संघातील निवडणूकी करिता स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर प्रथमच अतिदूर्गम वाघदरी येथील मतदान केंद्र क्र. 302 चे पथक वनविभागाच्या जीपने रवाना करतांना निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे), सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव व नायब तहसीलदार मोहम्मद रफीक


                औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील  निवडणूक अधिकारी कार्यालयातून मंगळवारी (ता.19) निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी  कावली मेघना (भाप्रसे) ,  तहसिलदार (किनवट) तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, तहसिलदार (माहूर ) तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि  किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी जीपीएस यंत्रणा बसविलेल्या वाहनाद्वारे मतदान पथके रवाना केली. याकरिता एस.टी. महामंडळाच्या बस 38, स्कूल बस 8, क्रूझर 28 , जीप 4 व ट्रॅक्टर 1 अधिग्रहीत केली आहेत.

किनवट : 83- किनवट विधानसभा मतदार संघातील निवडणूकीकरिता मतदान पथकास स्टाँगरूम मधून मत्रदान यंत्रे वाटप करतांना इव्हीष्म कक्षाचे नियंत्रण अधिकारी , तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव' , नोडल अधिकारी तथा नायब तहसिलदार मोहम्मद रफीक व मास्टर ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी आदी...


                जिल्ह्यातील ईतर विधानसभा मतदारसंघातून येथे आलेल्या 377 मतदान केंद्राध्यक्ष, 377 सहायक मतदान केंद्राध्यक्ष व 377 इतर मतदान अधिकारी एक व  377 इतर मतदान अधिकारी दोन अशा एकूण एक हजार पाचशे आठ आहे.  यांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व  मल्लीकार्जून स्वामी यांनी संगणक चालक तथागत पाटील यांच्या साथीने एलईडी वॉलवर  पॉवर पॉईंट प्रझेंटेशन द्वारे प्रशिक्षण दिले. रमेश मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर, सारंग घुले, फहीम खान, समशेर खान, गिरीश पत्की , प्रवीण पिल्लेवार , सुरेश पाटील , शेषराव पाटील , सूरज पाटील आदींसह सर्व 37 मास्टर ट्रेनर्स यांनी क्षेत्रिय अधिकारी व सहायक क्षेत्रिय अधिकारी यांनी सर्वांना मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले. 

किनवट : येथील शासकीय आय. टी.आय. प्रांगणात बुधवारी (ता.20) मतदानाकरिता साहित्य स्विकारून तपासणी करतांना 83- किनवट विधानसभा मतदार संघातील नियुक्त मतदान पथकं.


                  चोख पोलिस बंदोबस्त


83- किनवट विधानसभा मतदार संघाचे बंदोबस्त प्रभारी अधिकारी तथा उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाच्या वतीने मतदानासाठी  उप विभागीय पोलिस अधिकारी 2, पोलीस निरिक्षक 2, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक 10, पोलिस अंमलदार 365 , होमगार्ड 327 असे एकूण 14 अधिकारी, 706 पोलिस कर्मचारी (स्त्री -पुरुष), सीवोवाय 12 बीएन टीजीएसजी 1/2  सेक्शन 1 व बीएसएफ 1 प्लॅटून यांचा चोख पोलिस बंदोबस्त  उपलब्ध केला आहे.     

      गट विकास अधिकारी  सुरेश कांबळे (माहूर) यांच्या समन्वयात सर्व फिरते व स्थानिक पथक, जगदीश पऱ्हाड यांच्या समन्वयात 80 सहायक व क्षेत्रिय अधिकारी, स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड तसेच नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, रामेश्वर मुंडे, व्ही.पी. राठोड,  राजकुमार राठोड , केलास जेठे आदिंसह  के.डी. कांबळे, डी.सी. भुरे , नितीन शिंदे, व्ही.टी. सूर्यवंशी,  गोविंद पांपटवार, संदीप पाटील , प्रभू पानोडे , संतोष मुपडे, नामदेव धोंड , संदीप कदम आदिंसह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई व कोतवाल निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News