नांदेड : जिल्ह्यातील उमरी (रे.स्टे.) येथील 105 वर्षाच्या आजीबाईसह त्यांच्या चौथ्या पिढीने लोकशाहीला प्रगल्भ करण्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी करिता बजावला मतदानाचा हक्क.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोट निवडणूक- 2024 करिता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघ अंतर्गत बुधवारी (दि. 20 नोव्हेंबर) उमरी जि.नांदेड येथील उमरी नगर परिषद तर्फे श्री अहिल्याबाई होळकर सभागृह येथे साकारलेल्या आदर्श मतदान केंद्र येथे पद्मशाली समाजातील प्रतिष्ठित व वयोवृद्ध आजी शशिकलाबाई पोशट्टी टिप्रेसवार ( वय 105 वर्षे ), प्रतिष्ठित व्यापारी मुलगा बालाजी टिप्रेसवार ( वय 65 वर्षे ), सुन सौ. अनुसया, आरोग्य सेवेतील हिवताप विभागाचे राज्य पदाधिकारी व नातू सत्यजीत टिप्रेसवार ( वय 44 वर्षे ), नात सून सौ. रंजना सत्यजीत टिप्रेसवार यांनी तर पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेली व मतदानासाठी आलेली पणती कु. समीक्षा सत्यजीत टिप्रेसवार ( वय 21 वर्षे) हिने संदिपनी पब्लिक स्कूल , नांदेड येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.




No comments:
Post a Comment