किनवट : 83- किनवट विधानसभा मतदार संघातील किनवट शहरातील नगर परिषद नवी इमारत येथे असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 183 येथे व्हीलचेअरच्या सहाय्याने दिव्यांग महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे ) यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कक्षाचे नोडल प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, प्रा. डॉ. एस. के.बेंबरेकर, सहाय्यक अधिकारी प्रा. डॉ. सुनील व्यवहारे, सहाय्य्क तलाठी दयानंद येरडलावार, अयोध्या जटाळे, शिपाई गोविंद तगडपेल्लीवार , मिलिंद लोकडे यांनी एन.सी. सी., एन.एस.एस. व स्काऊट गाईड या स्वयंसेवकांच्या सहाय्याने दिव्यांग मतदारांना विविध सुविधा पुरविल्या आहेत.
प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे ) यांनी केल स्वयंसेवकांन मार्गदर्शन
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोकुंदा किनवट येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील साहित्य वाटप प्रसंगी विविध महाविद्यालयातील व शाळांमधील एनसीसी ,एनएसएस व स्काऊट गाईडच्या स्वयंसेवकांना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने दिव्यांग मतदार यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सहाय्य करावे असे मार्गदर्शन केले .
![]() |
| थारा येथे दिव्यांग मतदारास मतदान केंद्रात जाण्यासाठी सहकार्य करतांना दिव्यांग कक्षाचे स्वयंसेवक |
![]() |
| मांडवी येथे दिव्यांग महिला मतदार यांना मतदान केंद्रात नेतांना स्काऊट पथक |







No comments:
Post a Comment