*विधानपरिषदेच्या ६ आमदारांचा विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय! शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हेंकडून शुभेच्छांचा वर्षाव* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 27, 2024

*विधानपरिषदेच्या ६ आमदारांचा विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय! शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हेंकडून शुभेच्छांचा वर्षाव*




मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीने २०० चा आकडा पार करत घवघवीत यश मिळवलं आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विधानपरिषदेचे विद्यमान ६ सदस्य विजयी झाले आहेत. अशावेळी माहितीनुसार, दोन सदनांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार या नवनिर्वाचित ६ विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिध्द होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते. 


या यादीत शिवसेनेचे आमश्या पाडवी, भाजपचे प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर, भाजपचे रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर याची नावं आहेत. ते विधानपरिषदेत विद्यमान आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते बहुमताने निवडणून आले. अशा या खास प्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सदस्य असलेल्या आणि आता विधानसभेवर निवडून गेलेल्या या ६ सदस्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News