महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज 4 वाजता नागपूरात शपथविधी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 15, 2024

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज 4 वाजता नागपूरात शपथविधी

 



नागपूर (राजकीय विश्लेषक उदय नरे) : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपुरात होत आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज नागपुरात दाखल झाले आणि नागपूर मध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या . भारतीय जनता पार्टी व नागरिकांच्या वतीने भव्य अशी मुख्यमंत्र्यांची विजयी रॅली काढण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आपल्या शुभचिंतकांचा व कार्यकर्त्यांचा अभिनंदनचा स्वीकार केला.  आज  संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री राज्यपालांच्या  उपस्थितीत नवीन मंत्रिमंडळ सदस्यांचा शपथविधी करण्यात येणार आहे . नवीन मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षान काही नवीन चेहऱ्याला संधी दिली आली आहे तर शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आले. नितेश राणे या तरुण चेहऱ्याला यावेळी भारतीय जनता पक्षाने संधी दिली आहे तसेच गेले अनेक वर्ष दूर असलेल्या पंकजा मुंडे यांना सुद्धा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे. 

*राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 40 मंत्री शपथ घेणार आहेत.


भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन करण्यात आला, संपूर्ण यादी -


भाजप-

1. नितेश राणे 

2. शिवेंद्रराजे भोसले 

3. चंद्रकांत पाटील 

4. पंकज भोयर

5. मंगलप्रभात लोढा 

6. गिरीश महाजन 

7. जयकुमार रावल 

8. पंकजा मुंडे

9. राधाकृष्ण विखे पाटील

10. गणेश नाईक 

11. मेघना बोर्डीकर

12. अतुल सावे 

13. जयकुमार गोरे 

14. माधुरी मिसाळ 

15. चंद्रशेखर बावनकुळे

16. संजय सावकारे

17. अशोक उईके 

18. आकाश फुंडकर

19. आशिष शेलार


शिवसेना -

1. उदय सांमत

2. प्रताप सरनाईक

3. शंभूराज देसाई

4. योगश कदम

5. आशिष जैस्वाल

6. भरत गोगावले

7. प्रकाश आबिटकर

8. दादा भूसे

9. गुलाबराव पाटील

10. संजय राठोड

11. संजय शिरसाट 


राष्ट्रवादी -

1. आदिती तटकरे 

2. बाबासाहेब पाटील 

3. दत्तमामा भरणे 

4. हसन मुश्रीफ 

5. नरहरी झिरवाळ

6. मकरंद पाटील

7. इंद्रनील नाईक

8 .धनंजय मुंडे


नागपूर मध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादी नेते श्री छगन भुजबळ यांचे नाव समाविष्ट करण्यात न आल्यामुळे चर्चेचा विषय बनलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी धक्का तंत्र वापरल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News