पूर्णा (परभणी) : येथील रहिवाशी तथा आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये पॅंथर रिपब्लिकन नेते यादवराव सोमाजी भवरे यांचे बुधवारी (ता. 05 नोव्हेंबर 2025 ) सकाळी 9.00 वाजता हृदयविकाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात दोन मुलं, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार असून बुधवारी (ता. 05 नोव्हेंबर 2025 ) सायंकाळी 5.00 वाजता सम्राट अशोकनगर येथील त्यांचे निवासस्थानापासून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून त्यानंतर येथील बौद्ध शमशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.




No comments:
Post a Comment