किनवट : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात शनिवारी (ता.६ डिसेंबर ) सकाळी १० वाजता राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटच्या वतीने करण्यात आले होते.
प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, आमदार भीमराव केराम, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष साजीदखान , रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, प्राचार्या शुभांगीताई ठमके, सेक्युलर मुव्हमेंटचे जिल्हाध्यक्ष ऍड. मिलिंद सर्पे, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, प्राचार्य डॉ.आनंद भालेराव, रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, माजी उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्माणीवार , भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे , उत्तर मंडळ अध्यक्ष उमाकांत कऱ्हाळे , सामाजिक कार्यकर्त्या गंगूबाई परेकार, वनविकास महामंडळाचे निवृत्त विभागीय व्यवस्थापक , एसबीआयचे निवृत्त शाखा व्यवस्थापक , बसपाचे मिलिंद धावारे , विधानसभाध्यक्ष भीमराव पाटील , वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव दिनेश कांबळे , युवासेनेचे तालुकाध्यक्ष अजय कदम पाटील , भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष निवेदक कानिंदे , पोलिस निरीक्षक गणेश कराड , पोलिस उप निरीक्षक सागर झाडे आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुदायिक वंदना घेतली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुतळा व संरक्षण भिंतीची आकर्षक रंगरंगोटी , तसेच परिसरात आवश्यक तयारी करण्यात आली होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरासह परिसरातील भीम अनुयायांनी पुतळ्याजवळ अभिवादनासाठी गर्दी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो अनुयायांनी महामानवांना अभिवादन केले. ऍड. सुनिल येरेकार यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ उपासक मल्लूजी येरेकार यांच्या देणगीतून (सौजन्याने) पुतळ्यास पुष्पार्पण करण्यासाठी लोखंडी पायऱ्यांची शिडी कायमस्वरूपी उपलब्ध झाली.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत "युवा पॅंथर" संघटनेतर्फे निखिल वि. कावळे व ऍड . सम्राट सर्पे यांनी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत ७० दात्यांनी रक्तदान करून ७० व्या महापरिनिर्वाण दिनी कृतीशील अभिवादन केले.




No comments:
Post a Comment