आदिलाबाद (तेलंगाणा) : शुक्रवारी (ता. 12 डिसेंबर 2025) राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव सूर्यपुत्र भैयासाहेब उपाख्य यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची 113 वी जयंती भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा आदिलाबादच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम पूज्य भदंत आर्य संघमित्रा यांनी धूपदीप प्रज्वलित करून बुद्ध वंदना केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तेलंगणा राज्य सरचिटणीस प्रज्ञाकुमार रत्नझाडे होते. तथागत सम्यक सम्बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. यावेळी ते आपल्या भाषणात असे म्हणाल की, यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 रोजी झाला. ते रमाबाई व डॉ. भीमराव आंबेडकर यांचे एकमेव सुपूत्र म्हणून त्यांना सूर्यपुत्र म्हणतात . बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देशभर आणि परदेशात प्रवास केला. डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे ते दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी बौद्ध धम्म दीक्षा, धम्म परिषद आणि धम्म मेळावे इत्यादी अनेक उत्तम कार्यक्रम घेतले होते. त्यांच्याच प्रयत्नातून श्रीलंका, थायलंड आणि म्यानमारसारख्या देशांमध्ये बौद्ध धम्म प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. बुद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करून त्यांनी आपले सर्वोत्तम काम केले आहे. त्यांनी फेडरेशन वॉर्स फ्रीडम अँड थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट हे पुस्तक लिहिले आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस दयानंद पोटफोडे, केंद्रीय शिक्षक कांताराव वाघमारे, माजी जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संदीप दांडगे, रामबाई आंबेडकर महिला मंडळाच्या जिल्हा अध्यक्ष दयाशीला हुक्के, समता फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सेल्व, लक्ष्मण हुक्के, प्रवीण यांच्यासह बहुसंख्य उपासक उपासिका कार्यक्रमात सहभागी झाले होते.




No comments:
Post a Comment