डोंबिवली / कल्याण ( आशा रणखांबे ) : " ज्येष्ठ साहित्यिक लेखक,समिक्षक,कवी मनाचा प्रा. शुक्राचार्य गायकवाड हा माझा सख्खा मित्र म्हणून शोभतो तेव्हा लेखकांनी चरित्र अन चारित्र्य जपावेच लागेल " असे प्रतिपादन अ.भा.म. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक, समीक्षक, विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केेेले.
साहित्यिक, समीक्षक, विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या सुमेरू प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ३६ भाषेत 'पाऊस' कविता संग्रह, ३२ भाषेत 'माझ्या कविता' कविता संग्रह, पक्षांच्या कविता 'तू आणि मी' कविता संग्रह आणि 'बुद्धगया' एक यात्रा अनुभव हिन्दी अनुवाद या चार पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करतांना सर्वेश हॉल डोंबिवली येथे ते बोलत होते.
यावेळी साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकलो असे सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे पत्रकार किरण सोनावणे, साहित्यिक प्रा. भरत शिरसाठ, हिन्दी भाषा अभ्यासक मंगला पाटील, कवयित्री विद्या भोरजारे, पत्रकार जान्हवी मौर्य यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्या निमित्ताने आपले विचार मांडले.
याप्रसंगी बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे धनराज गायकवाड, डॉ.सुरेंद्र शिंदे, दीपश्री माने-बलखंडे, जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे , भीमराव रायभोळे, प्रमोद भोरजारे , यशवंत गायकवाड, अशोक गायकवाड, पी.एच. वाघ , भटू जगदेव आदी मान्यवरांसहित साहित्य आणि रसिकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. प्रफुल्ल केदारे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संदेश गायकवाड यांनी आभार मानले.




No comments:
Post a Comment