नांदेड : येथील कैलासनगर मधील रहिवाशी ज्येष्ठ उपासिका सुधाताई स्मृतीशेष प्रा.डॉ. नरेंद्र गायकवाड (वय 79 वर्षे) यांचे शनिवारी (ता. 13 डिसेंबर 2025) पहाटे तीन वाजता हृदयविकाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा राहते घर येथून शनिवारी (ता. 13 डिसेंबर 2025) रात्री 10 वाजता निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे माजी प्रदेश उपाध्यक्ष स्मृतीशेष प्रा.डॉ. नरेंद्र गायकवाड यांच्या त्या पत्नी , अनिरुद्ध व विनय यांच्या मातोश्री व अपेक्षा हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप फुगारे यांच्या त्या सासू होत.




No comments:
Post a Comment