नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्रातील आठवडी बाजार मतदान व मतमोजणीच्या दिवशी राहतील बंद # किनवटचा बाजार आता 22 रोजी भरणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 15, 2025

नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्रातील आठवडी बाजार मतदान व मतमोजणीच्या दिवशी राहतील बंद # किनवटचा बाजार आता 22 रोजी भरणार




नांदेड ता. 15 डिसेंबर :- जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत सुधारित सार्वत्रिक निवडणुक-2025 च्या अनुषंगाने नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी व मतमोजणी दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.  हे सर्व आठवडी बाजार हे सोमवार 22 डिसेंबर 2025 या रोजी भरविण्यात यावेत, अशा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर अॅक्ट, 1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन निर्गमीत केला आहे


नांदेड जिल्ह्यातील निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदानाच्या दिवशी व रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिनांकास आदेशात नमुद केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतक्षेत्रात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

#21 रोजी किनवट


शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणाची नावे निरंक आहेत. तर रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाण बिलोली, धर्माबाद, मुदखेड, किनवट या नगरपरिषदेचा यात समावेश आहे. देगलूर, हदगाव, नगरपंचायत हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुखेड, उमरी, भोकर, लोहा या नगपरिषद निरंक आहेत. या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात भरणारे सर्व आठवडी बाजार हे सोमवार 22 डिसेंबर 2025 या रोजी भरविण्यात यावेत. हा आदेश 11 डिसेंबर 2025 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.


मतमोजणीमुळे किनवटचा आठवडी बाजार सोमवारी (ता. 22 डिसेंबर) भरणार


किनवट : किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने रविवारी (ता. २१ डिसेंबर २०२५ ) मतमोजणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे किनवटचा आठवडी बाजार रविवार ऐवजी सोमवारी (ता.२२ डिसेंबर २०२५) भरणार आहे ; याची नोंद शहरातील व आसपासच्या सर्व गावातील जनतेंनी घ्यावी असे  जाहीर आवाहन नगर परिषदेचे मुख्यधिकारी विवेक कांदे यांनी केले आहे.

     किनवट  नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी ता. २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते . त्याची मतमोजणी रविवारी (ता.२१ डिसेंबर २०२५ ) आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचे आदेश क्र.२०२५/आरबी-१/डेस्क-२/टे-४/न.प. व न.पं./नि/प्र.क्र.७९/ दि. ११ डिसेंबर, २०२५ या अन्वये किनवट शहरातील दि.२१/१२/२०२५ (रविवार) रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार हा रद्द करुन सदर आठवडी बाजार हा सोमवारी (ता. २२/१२/२०२५ ) भरविण्यात येणार आहे.

तरी, किनवट शहरातील व आसपासच्या गावातील सर्व जनतेनी व व्यापा-यांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन मुख्याधिकारी श्री कांदे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News