लोककलेचा गौरव व सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी शनिवारी (ता.29 ऑगष्ट) किनवटमध्ये "लोकवंतांचा जागर" - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, August 28, 2026

लोककलेचा गौरव व सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी शनिवारी (ता.29 ऑगष्ट) किनवटमध्ये "लोकवंतांचा जागर"

 



 किनवट : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा गौरव, लोककलावंतांचा सन्मान तसेच सांस्कृतिक वारशाचे संवर्धन या उद्देशाने आज शनिवारी ( ता. 29) सकाळी 10 वाजता "लोकवंतांचा जागर" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कलावंत व कलाप्रेमिंनी उपस्थित रहावे , असे आवाहन करण्यात आले आहे.

     पारंपारिक लोक कलावंतांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य) तालुका शाखा किनवटच्या वतीने माहूर रोडवरील कलावती गार्डन येथे या सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

     कार्यक्रमास हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून किनवट विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम हे उद्घाटक म्हणून उतर मिलिंद शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव अभि. प्रशांत ठमके हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

     याप्रसंगी माहूरचे नगराध्यक्ष फेटोजभाई दोसानी, सिने अभिनेते डॉ.प्रमोद अंबाळकर व  पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक त्रिरत्नकुमार मा. भवरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

     कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदाच्या प्राचार्या शुभांगीताई ठमके आणि बळीराम पाटील महाविद्यालय, किनवटचे उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे हे लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत. उत्तम कानिंदे हे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील.

     या कार्यक्रमामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे अनेक मान्यवर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

     या कार्यक्रमास किनवट व माहूर तालुक्यातील सर्व लोककलावंत, शाहीर, कलाकार, साहित्यप्रेमी आणि कलाप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे मनःपूर्वक आवाहन स्वागताध्यक्ष युवानेते करणभाऊ एंड्रलवार , निमंत्रक दत्ता उद्धवराव कसबे, आयोजक दिलीप गंगाराम मुनेश्वर व  संयोजक विवेक मारोतराव ओंकार यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News