शालेय विद्यार्थिनीसह सर्व महिलांना मासीक पाळी व्यवस्थापनाचे महत्वपटून द्यावे
-समृध्दी दिवाने, गटविकास अधिकारी
नांदेड ( शब्दांजली कानिंदे ) :
ग्रामीण भागातील महिला, किशोरवयीन मुली, शालेय विद्यार्थीनी व शाळा बाह्य मुली यांच्यापर्यंत मासीक पाळी व्यवस्थापनाचं महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन नांदेड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी समृध्दी दिवाने यांनी केले. नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आजपासून नांदेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, सहाय्यक गट विकास अधिकारी अनिता सरोदे, कंधार येथील राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमाच्या वैद्यकिय अधिकारी मास्टर ट्रेनर डॉ. बी.बी. कांबळे, डॅा. मुनेश्वर, महानंदा पवळे, ज्योती रावते, मंजुषा जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीणा मांदळे, अंगणवाडी पर्यवेक्षीका नसरीन अब्दुल करीम, शेख शमीम आदींची मंचावर उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, महिलांचे आरोग्य हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरला असून कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. ती जागरुक व्हावी तसेच समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे असल्याने महिलांसह किशोरवयीन मुलींना मासीक पाळी व्यवस्थापनाचं महत्व जाणवलं पाहिजे, असे मत गट विकास अधिकारी समृध्दी दिवाने यांनी व्यक्त केले.
प्रारंभी संत गाडगेबाबा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करुन गट विकास अधिकारी समृध्दी दिवाने यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांचे जिल्हा परिषदेच्या वतीने बुके देवून स्वागत करण्यात आले. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी अनिता सरोदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत परिचय, वातावरण निर्मितीसाठी गट चर्चेत किशोर अवस्था व बदल, नैसर्गिक बदलाबाबतचा पूर्वग्रह अनुभव कथन, मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी संदर्भात निर्माण होणारी आव्हाने व उपाय, मासिक पाळीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी, मासिक पाळीच्या दरम्यान काळजी न घेतल्याने कोण कोणत्या आजाराला सामोरे लावे लागते, मासिक पाळी व्यवस्थापनाचे फायदे या विषयावर मार्गदर्शन व गट चर्चा करण्यात आली. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातून अंगणवाडी पर्यवेक्षीका, सह शिक्षीका, ग्रामसेवीका, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आरोग्य पर्यवेक्षीका, आरोग्य सेवीका, राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोती अभियानाच्या समन्वयीका यांना निमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञ चैतन्य तांदुळवाडीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार नसरिन अब्दुल करीम यांनी मानले. यावेळी नांदेड पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी जीवन कांबळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी गणेश शिवरात्री, अधिक्षक अल्केश शिरशेवाड, समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे, मनुष्यबळ विकास सल्लागार सुशिल मानवतकर, पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई, गट समन्वयक चंद्रमुणी कांबळे, मोहिनी जाधव आदींची उपस्थिती होती.
आज कार्यशाळेचा समारोप
"दोन दिवस चालणा-या या अनिवासी कार्यशाळेचा आज समारोप करण्यात येणार आहे. समारोप प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. आज दुस-या दिवशी कार्यशाळेत मासिक पाळी व्यवस्थापनाच्या विविध पध्दती व उपाय योजना, मासिक पाळी हा विषय सर्व सामान्य बनविणे, त्याबाबतच्या कथा- चुकीच्या संकल्पना या विषयाच्या बाबी हाताळणे, प्रशिक्षणाची भूमिका व जबाबादारी आणि कार्यपध्दती, प्रश्न, शंका निससन व चर्चा आदी विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. "
Very good news writing
ReplyDelete