विक्रीसाठी आणलेले अडीच कोटीचे दोन मांडूळ वनविभागाने केले हस्तगत. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, April 30, 2019

विक्रीसाठी आणलेले अडीच कोटीचे दोन मांडूळ वनविभागाने केले हस्तगत.

विक्रीसाठी आणलेले अडीच कोटीचे दोन मांडूळ वनविभागाने केले हस्तगत.




शेख मजहर
सारखणी (ता. किनवट )  :
उपवनसंरक्षक आशीष ठाकरे नांदेड  व सहायक उपवन वनसंरक्षक डॉ.राजेंद्र नाळे, किनवट  यांचे मार्गदर्शनाखाली माहूर वनपरीक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहीतीवरून ता.30 एप्रिल रोजी बारा वाजता  सारखणी गावामध्ये वनपरीक्षेत्राधिकारी अविनाश तायनाक (मांडवी ), राहुल शेळके (फिरते पथक ) यांनी सापळा रचून केलेल्या कार्यवाहीत  दोन मांडूळ (sand boa ) हस्तगत केले असून 6 आरोपीना ताब्यात घेतले आहे.
             वनविभागाच्या अधिका-यांनी हस्तगत केलेल्या दोन मांडूळाचे वजन अनुक्रमे 550 ग्राम व  1.80 किलो एवढे असून त्याची किंमत सुमारे अडीच कोटी एवढी  आहे. तस्करी करणारे आरोपी आशा विजय चव्हाण रा.निंगनूर ता.उमरखेड जि.यवतमाळ, सुरेश शंकर राठोड मदनापूर ता.माहूर, मोतिसिंग प्रकाश तगरे, सुंदरसिंग गणेश बेले  रा.परोटी,नागनाथ जालम पडवल,पांडुरंग शिवाजी जगताप रा.नागसवाडी, लक्ष्मण माधव भरकड रा.कमठाला ता.किनवट यांना वाई बाजार व सारखणी या भागातून   ताब्यात घेतले असून त्यांचेवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मधील कलम 9,39,48अ,49 अ व 51 नुसार गुन्हा नोंद करण्यात  आला.सदर प्रकरणी सहा. वनसंरक्षक  डॉ.नाळे यांचे मार्गदर्शनात कवळे पाटील  हे पुढील तपास करीत आहेत.
    या कार्यवाहीत वनपाल सोनकांबळे, संतवाले, वनरक्षक फोले, श्रीमती माहूरे, घोरबांड, कोटकर, कराळे,गेडाम,राठोड,मुसांडे,वानोळे,शिंदे,बरले,धोंडंगे, क्षीरसागर व वाहनचालक भूतनर व आठवले यांनी मोलाची कामगिरी केली आहे.


1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News