घासभर कुटका घोटभर पाणी ( कविता )
----प्रा.नंदू वानखडे ,मुंगळा जि.वाशिम --9423650468..
भुकेल्यांना देणार नाहीत...
घासभर कुटका , घोटभर पाणी.
पाळलेल्या कुत्र्याची मात्र
काळजी घेतिल माणसावाणी...!"
भाविक भक्तांनी काठ्या घालून
मंदिरात निजलेलं कुत्र मारायचं..
ज्यांचे पोटं भरलेले आहेत
त्यांना सुरूची भोजन चारायचं...!"
दारात कोणी येवो भिकारी
त्याला काहीच नाही वाढायचं...
कुत्र पाळून घरच्या दुरडीत
भाकरीचं खातं काढायचं...!"
गळ्यात बांधून साखळदंड पट्टा
दोन्ही सांज कुत्र हागवायचं..
कुत्र्यासोबत माॅर्निंग वाक अन्
प्राणी प्रेम आपलं जागवायचं....!"
गरजू माणूस दिसला की ,
पद्धतशीर त्याला टाळायचं..
मग ,गाडी बंगला ,तुझं ऐश्वर्य
काय 'राॅकेल 'टाकून जाळायचं...?"
सुंदर कविता आहे.वर्तमानवर भाष्य करतांना येणाऱ्या काळाशी सुसंगती सांधते.
ReplyDelete