अॅड बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस स्वाभिमानी सप्ताह म्हणून साजरा करावा
मुंबई ( शालिनी कानिंदे ) :
वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अॅड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर या स्वाभिमानी नेत्याचा 65 वा वाढदिवस ता.10 मे रोजी संपूर्ण भारतभर विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करून साजरा करण्याचा निर्णय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीने घेतला आहे.
राज्यातील सर्व शाखा : राज्य, जिल्हा, महानगर, तालुका, शहर, वॉर्ड व ग्रामशाखा तसेच महिला आघाडी व युवा शाखा, सम्यक विध्यार्थी आंदोलन यांनी आपापल्या प्रत्येक शाखास्तरावर श्रद्धेयअॅड.बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करीत असताना ता. 3 मे ते 10 मे 2019 पर्यंत स्वाभिमान सप्ताह म्हणून साजरा करावा. यानिमित्त आयोजकांनी खालील उपक्रम अग्रक्रमाने राबवावेत
उपक्रम
1. विद्यार्थ्यांना दफ्तर,पुस्तके, वह्या, पेन इ शालेय वस्तूंचे वाटप.
2. पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्यास छत्रीचे वाटप.
3. अनवाणी रोजगारांना बूट-चप्पल वाटप.
4. रुग्णांना फळ वाटप.
5. डोळे तपासणी कॅम्प.
6. रोग निदान शिबीर.
7. रक्तदान शिबिर.
8. निबंध/रांगोळी/विविध स्पर्धा.
9. दुष्काळी भागात टँकर द्वारे पाणी वाटप
10. जनावरांना चारा वाटप
इत्यादी....
घेतलेल्या उपक्रमांचा तपशील पक्षाच्या व प्रबुद्ध भारत पाक्षिकाच्या इमेल id वर एक-एक फोटोसह पाठवावा तसेच आपल्या जिल्ह्याच्या/शाखेच्या whatsapp ग्रुपवर माहिती टाकावी
3 मे ते 10 मे 2019 - स्वाभिमानी सप्ताह असे बोर्ड/बॅनर बनवावे त्यावर बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो टाकून 10 मे तारीख मजकुरासह ठळकपण प्रसिद्धकरावी. प्रत्येक शाखेने ज्याप्रमाणे सोयीचे होईल त्याप्रमाणे जास्तीतजास्त उपक्रम राबवावेत.
तसेच परिचित असलेल्या व्यक्ती/संस्था/मंडळे/क्रीडामंडळे जे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांना मानतात/समर्थक आहेत. त्यांचेशी संपर्क करून त्यांना सुद्धा उपक्रमात सहभागी करून घ्यावे किंवा त्यांना स्वतंत्रपणे उपक्रम करण्यास सांगून आपल्यापरीने त्यांना सहकार्य करावे. असे आवाहन
भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश कमिटी
महाराष्ट्र राज्यचे प्रवेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले आहे
No comments:
Post a Comment