तुला मी पुसतो भारत देशा....!' - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 3, 2019

तुला मी पुसतो भारत देशा....!'

तुला मी पुसतो भारत देशा....!'

--प्रा.नंदू वानखडे ,मुंगळा जि.वाशिम --9423650468..


तुला मी पुसतो ,
भारत देशा....!
तव चेह-यावर कुणी ओढल्या
जाती - जातीच्या  खरबड रेषा...?

रोजच होई येथे लढाई
भिती येथली संपत नाही
तुझ्या डोक्याला अमुक शेला
बांधायची  ही कसली घाई...?

पेटून ऊठतो जो तो बंडा
लाविन म्हणतो आपलाच झेंडा..
विध्वंसाच्या बहू दिशेने
निघला हा माणसांचा लोंढा....!


धर्म , देऊळे गर्वगुमाने
मानवता ' ती लयास गेली...
जाती दंगली धाक बळाने
किती बिचारी माणसे मेली....!"


सभ्य,संस्कृती मुखवट्याने
देशास भुलविले ज्याने त्याने
संविधानाचे खोटे गाणे
काय , चालले हे मनमाने...?"


आम्ही सारे तुझेच भक्त
आमचाच धर्म श्रेष्ट फक्त..
या हेक्याच्या आसक्तीपायी
कितीक आणिक सांडेल रक्त...?"



'भारत माझा..'प्रतिज्ञा अन्..
नारे मुखातून ' भारत माता...'!
या गर्दीतून फिरून आलो
'माणूस ' कुठेच तो दिसेना आता...!'


कितीक ह्या आक्रोश ,आरोळ्या
सज्जनांच्या सशस्त्र टोळ्या..?
निर्बलाच्यां...छातीवरती
दुर्जनांच्या गनिमी गोळ्या...?


तुला मी पुसतो ,भारत देशा...!
काय धरावी आम्ही रे आशा..
कधी मिटतील तव चेह-याच्या
जाती जातीच्या खरबड रेषा...?"

     ---- प्रा.नंदू वानखडे , मुंगळा जि.वाशिम --9423650468..


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News