माणसात देव पहा म्हणे संत...!
---प्रा.नंदू वानखडे,मुंगळा जि.वाशिम-9423650468..
डोकं टेकवूनी
पुजितसे देवा
माणसाचा हेवा
करूनिया...
माणसात देव
पहा म्हणे संत..
तरी का ते जंत..
ऐकती ना...!
माणसा माणसात
करीताती द्वेष
भक्तीचा गणवेश
घालूनिया....!
जाईना मनाचा
अंतरंगी मळ
ठोकूनिया तळ
बैसलासे....
पाप नि पुण्याच्या
मारताती गप्पा
आपला तो कप्पा
रिकामाचि...!
कळेना तयासी
माणुसकी धर्म
ऊलटेच कर्म
करताती... !
नंदू म्हणे तया
येवो आता भान
माणसाचा मान
ठेवण्याचे..!"
No comments:
Post a Comment