माणूस कधी माणूस होईल का..?
-----प्रा.नंदू वानखडे,
मुंगळा जि.वाशिम--9423650468..
कशी जळते वस्ती आणि
होते ऊध्द्वस्त झोपडी माझी..?
कशी काय रे रोजच येते
पेपरात बातमी ताजी...?
अन्यायाची रोजच कैसी
वळती पाऊले ईकडे..?
का आमुच्या देहासह
भावनेचेही लाखो तुकडे...?
किती ऊन्हाळे सोसायचे..
किती जिवाला कोसायचे...?
किती पिढ्याच्या घुसमटीचे
जाब कुणाला पुसायचे...?
समता नांदावी घरोघरी...
मागास वर्ग यावा वरी
प्रगत व्हावा कसा तरी
यावी आरक्षणातून बरोबरी...!
तेही का खुपते सलते रे..
का विरोधी मनसुभे भलते रे...?
सुर्य नभीचा कालांतराने
तापून दिवसही कलते रे...!'
किती दिवस ऊन्ही तापायचे
किती मन इच्छा आतच कापायचे..?
अन्यायाचे चढते आलेख
कुण्या मोजपट्टीने मापायचे...?
अन्याय कुठवर कुणी असा झेलतो का..?
त्याविरोधात कुणी माणूस तरी
जाहीर बोलतो का..?
भाकडकथा व्यर्थ प्रवचने पण
माणसासाठी पट्टी खोलतो का...?"
तो दिवस कधीतरी येईल का..?
माणूस कधी माणूस होईल का...?
दुस-याचे दुःख आपले समजून
ओझे आपल्या पाठी घेईल का...?"
No comments:
Post a Comment